मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी असलेले तथा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दा वर आमदारकीचा राजीनामा देणारे पहिले आमदार तथा मागच्या वेळी अपक्ष लढुन 2लाख 83 हजार मतदान घेणारे ,तसेच यंदा अपक्ष लोकसभा लढण्यासाठी रणसंग्रामात उतरलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना उमेदवारी देण्याचे सुचित केले आहे...

हर्षवर्धन जाधव यांच्या नावाने महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेनां अगोदर धडकी भरली आहे. त्यात महायुतीचा वतीने हर्षवर्धन जाधव यांना उमेदवारी दिल्यास मराठा समाजाचा सरसकटपणे पाठिंबा हर्षवर्धन जाधव यांना मिळणार आहे. त्याच बरोबर भाजप व शिवसेना (एकनाथ शिंदे) गट यांच्या ताकद मिळाल्यावर हर्षवर्धन जाधव यांच्या विजय एकहाती होऊ शकतो...

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा परिणाम लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर,जालना, बीड,परभणी, हिंगोली, नांदेड, लातुर या जागेवर होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे..

त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना दरम्यान संदीपान भुमरे यांनी मधस्ती करत मी आरक्षण घेऊनच दाखवतो असे उद्गार काढुनही समाजाच्या हातात ठोस असे काही न लागल्याने आणि स्वतःच्या मतदार संघ छत्रपती संभाजीनगर लोकसभेत येत नसल्याने संदीपान भुमरे यांच्याकडे उपरा उमेदवार म्हणून बघितले जाते आहे.

 त्यातच सोशल मिडियावरुन संदीपान भुमरे यांच्याकडे देशी व विदेशी दारुचे व्यापारी म्हणुन जोरदार ट्रोलिंग होत आहे तर दुसरीकडे टक्केवारी वर विकासाच्या नावाखाली चाललेला पालकमंत्री पदाचा वापर तर माझ्या भुमरेचां मुलाला आमदारकी लढ्यायची असल्याने मला खासदारकी लढायची आहे असे बाशिंग भुमरे बांधून बसले आहे.

चाणक्य म्हणून ओळखले जाणारे आ.संजय शिरसाट यांनी संदीपान भुमरे यांचे नाव पुढे करुन एका दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. चंद्रकांत खैरे यांच्याशी असलेले वैयक्तिक हेवेदावे तसेच येणारा विधानसभेसाठी चंद्रकांत खैरे आपल्या विरोधात स्वतःच्या मुलाला ( ऋषिकेश खैरे) उभे करणार असल्याचे लक्षात असल्यामुळे खैरेंना रोखण्यासाठी भुमरेचीं ढाल करत आहे. तसेच मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी त्यांचा विरोधात उघडपणे केलेला भाजपचे बंडेखोर अपक्ष उमेदवार राजु शिंदे यांच्या प्रचारामुळे विनोद पाटील यांच्या विरोधात उघडपणे विरोधात जाण्याची भुमिका घेतली आहे, तसेच संदीपान भुमरे यांना खासदारकीला उभे करुन मराठा व ओबीसी मतांचे विभाजन करून स्वतंत्र ताकद निर्माण करुन पुढील काळात आपले मंत्री पदाचा रस्ता मोकळा करण्यासाठी ही धडपड सुरू आहे, अब्दुल सत्तार यांनी सुद्धा विनोद पाटील यांच्या नावाला विरोध करत मराठा उमेदवार म्हणून कन्नड चे मा.आ.नितीन पाटील यांचे नाव समोर केले होते.

एकंदरीत छत्रपती संभाजीनगर लोकसभेत महायुतीचा उमेदवार म्हणून भाजपच्या वतीने खा.डाॅ.भागवत कराड यांचे नाव फायनल आहे, परंतु पारंपरिक पद्धतीने छत्रपती संभाजीनगर ची जागा शिवसेनेची असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता भाजपची गळचेपी करण्यासाठी कन्नड चे मा.आ.हर्षवर्धन जाधव यांच्या नावाला सुचित करत मराठा कार्ड खेळले आहे.. 

विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांच्या नावाला आ.अब्दुल सत्तार,आ.संजय शिरसाट,आ.प्रदीप जैस्वाल,आ.रमेश बोरनारे यांची सहमती दर्शविली आहे.

कन्नड चे मा.आ.हर्षवर्धन जाधव यांच्याकडे अभ्यासु, उच्चशिक्षित तसेच अनुभवी लोकप्रतिनिधी म्हणून पाहिले जाते,त्यातच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिलेल्या राजीनामा,अपक्ष म्हणून घेतलेली मतदानाची आकडेवारी, जनसंपर्क स्वःताच्या हक्काचें विधानसभा मतदारसंघाचे मतदान पाहता पालकमंत्री संदीपान भुमरे,भागवत कराड यांच्या तुलनेत हर्षवर्धन जाधव यांचे पारडं वरचड ठरणार आहे.

यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या टप्प्यात राखुन ठेवलेला हुक्कामचा एक्का बाहेर काढ्यणाचे संकेत दिले आहेत.

यामुळे महाविकासाघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना घाम फुटला आहे, हर्षवर्धन जाधव यांना महायुतीचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याची तयारी करून एक प्रकारे मुख्यमंत्री यांनी भाजपसह शिवसेना अंतर्गत असलेली दुफळी मोडण्याचे काम केले आहे असे दिसते.

परंतु कन्नड चे आ.हर्षवर्धन जाधव यांनी आणखी या बाबतीत काही माहिती नसल्याचे सांगितले आहे. परंतु महायुतीचा वतीने उमेदवारी मिळाल्यास मराठा, मुस्लीम व ओबीसी आरक्षणासह मुख्यमंत्राकडुन शब्द घेऊनच उमेदवार म्हणून लढु अन्यथा अपक्ष म्हणून जनसामान्यांच्या जोरावर ही लोकसभा आपण लढवुन विजयी गुलाल उधळु हा आत्मविश्वास बोलुन दाखविला आहे.

 हर्षवर्धन जाधव यांच्याकडे स्वःताच्या विधानसभा मतदारसंघातील लाखांचां मतदानाचा आकडा,जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंदोलन करुन मिळवुन दिलेले पिकविमेचे पैसे,पिककर्ज वाटप ,लाईट बिलन भरता उन्हाळ्यात चालु ठेवलेले विजकनेक्शन ,कोरोना काळात मोफत वैद्यकीय उपचारासाठीचे आंदोलन तसेच महानगरपालिका क्षेत्रातील गुंठेवारी कायदा अंमलबजावण्यासाठी केलेलं आंदोलन यासारख्या सातत्याने केलेल्या कामांच्या जोरावर जनसामान्यांच्या पाठिंबा मिळत आहे.

मुस्लिम समाजात असलेली विश्वासआहर्ता आणि मराठा संघटनेचे केडर कार्यकर्ताच्या सुक्ष्म नियोजनावर आणि बहुजन समाजातील संघटनेच्या सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची ताकदीने आपण या रणसंग्रामात उतरलो आहे, असे हर्षवर्धन जाधव यांचे म्हणणे आहे. 

गूढीपाढव्यच्या मुहूर्तावर ९ एप्रिल रोजी हर्षवर्धन जाधव यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर च्या जिल्हा कोर्टा समोरील जागेवर आहे, पुन्हा एकदा अपक्ष म्हणून ट्रॅक्टर चा फॅक्टर चालवत....यंदा नागंरासकट लोकसभा पालथी घालणार असल्याचे सांगितले जाते.