शिरुर दिनांक :जगदगुरु नरेंद्राचार्याजी महाराज यांचा समस्या व मार्गदर्शन कार्यक्रम दि ०२ व ०३ एप्रिल रोजी सुखकर्ता लॉन्स, पुणे नगर रोड, रांजणगाव गणपती, या ठिकाणी होणार आहे. मंगळवार दि.०२ रोजी सकाळी ९ वाजता स्वागत समारंभ होईल व त्यानंतर प्रवचनाला सुरुवात होणार आहे. सकाळी ११ नंतर दर्शन व समस्या मार्गदर्शन सोहळ्यास सुरुवात होणार असून समस्या मार्गदर्शन सोहळा संध्याकाळ पर्यंत असणार आहे. त्याच दिवशी उपासक दिक्षाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. ०३ रोजी सकाळी आरती होईल तसेच प्रवचन झाल्यानंतर समस्या मार्गदर्शन व दर्शन व साधक दिक्षाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहान जगदगुरु नरेंद्राचार्याजी महाराज संस्थान उपपीठ पश्चिम महाराष्ट्र पीठाचे प्रमुख संजय गाडेकर तसेच पीठ व्यवस्थापक सुधांशु यांनी केले आहे. संस्थान मार्फत अनेक समाजिक शैक्षणिक वैद्यकीय कृषीविषयक उपक्रम मागील अनेक वर्षापासुन मोफत राबविले जात आहेत. संस्थानमार्फत विविध हायवेवर एकुण ५२ रुग्णवाहिका अपघातग्रस्त रुग्णांना मोफत सेवा देत असून या रुग्णवाहिकाच्या माध्यमातून २१५०० लोकांचा जीव वाचवला आहे. तसेच नाणिज येथे पदवीपर्यत इंग्लिश माध्यमाची शाळा असून पदवीपर्यंत इंग्लिश माध्यमातून गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जात आहे. वैद्यकीय उपक्रमाअंतर्गत संस्थानाच्या पुढाकारामुळे एकुण ५३ लोकांचे मरणोत्तर देहदान झालेले आहे. तसेच ब्लड इन नीड या वैद्यकीय उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास २०००० रुग्णांना मोफत रक्त देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत. संस्थानाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमामध्ये ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम, शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण आपत्तकाळीन मदत कार्य असे विविध कार्यक्रम करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली .

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |