शिरुर - छत्रपती शिवाजी महाराज यांचे नेतृत्व दूरदृष्ट्री असणारे , पराक्रमी व अष्टपैलू असे होते . छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श युवकांनी घ्यावा असे आवाहन आमदार ॲड . अशोक पवार यांनी केले . शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे)वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शिरूर शहरात साजरी करण्यात आली. पुणे नगर रस्त्यावर जुन्या नगरपरिषद कार्यालया जवळ शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले . आमदार अशोक पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याच बरोबर जैन धर्मगुरू आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या ही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपटराव शेलार, शहरप्रमुख माजी नगरसेवक संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे,  नीलेश खाबिया ,माजी नगरसेवक मंगेश खांडरे, मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, विश्वास ढमढेरे, किरण बनकर, शैलजा दुर्गे, खुशाल गाडे, पप्पू गव्हाणे, संतोष पवार, सुनील चौधरी, नोटरी रविंद्र खांडरे, राजेंद्र चोपडा, पोपटराव ढवळे, आदी उपस्थित होते . पवार यावेळी म्हणाले की सर्वाना बरोबर घेवून शिवाजी महाराज यांनी राज्यकारभार केला . छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभर साजरी केली जात असल्याचे ही पवार म्हणाले . संजय देशमुख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिलेल्या मार्गानुसार व विचारांनुसार आपणा सर्वाना वाटचाल करायची आहे. यावेळी सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले

. फोटो ओळी  - शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार ॲड . अशोक पवार