शिरुर दिनांक (वार्ताहर ) ज्ञान ही शक्ती असून अनेक आव्हांनावर मात ज्ञान व शिक्षणाद्ववारे करता येते . असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर शिरुर येथे म्हणाले . गंगा एजूकेशन सोसायटी संचालित ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल शिरुरच्या सीबीएसई इमारतीचे भूमीपूजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते झाले या प्रसंगी ते बोलत होते . यावेळी भाजपाचे राज्य पदाधिकारी नोटरी धर्मेंद्र खांडरे , पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे ,भूमी अभिलेखचे आधिकारी भोसले ,निवृत्त आरटीओ देवखिळे , भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे , माजी सरपंच अरुण घावटे , नेत्ररोगतज्ञ डॉ. राहुल घावटे , उपसरपंच बाबाजी वर्पे , माजी सनदी आधिकारी भानुदास शेळके , नवनाथ फरगडे , माजी उपसरपंच नामदेव घावटे , ॲड .गौरव बाफना , प्रा .डॉ पी एस वीरकर , प्रभु घावटे , संस्थेचे पदाधिकारी दीपक घावटे , सविता घावटे , अमृतेश्वरी घावटे ,मुख्याध्यापक संतोष येवले , प्राचार्या रुपाली जाधव , गौरव खुटाळ, बाळासाहेब शेवाळे ,प्रा .सुधीर शिंदे , सुनील घावटे , , संस्थेचे सीईओ डॉ. प्रा. नितीन घावटे , सरपंच जगदीश पाचर्णे , डॉ .आखिलेश राजूरकर , महेश कटारिया , प्रा.चंद्रकांत धापटे  , आदी यावेळी उपस्थित होते निंबाळकर म्हणाले की ज्ञान ही शक्ती असून अनेक आव्हांनावर मात ज्ञान व शिक्षणादवारे करता येते . ज्ञानगंगा शिक्षण संस्था गुरुकुल शिक्षण पध्दती दवारे चांगले विद्यार्थी घडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शिरुर मध्ये शैक्षणिक हॅब उभे राहिले आहे.अनेक शिक्षणसंस्थाच्या शाळा या परिसरात कार्यरत आहे . शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये असे ही ते म्हणाले . शिक्षणसंस्थानी आपली गुणवत्ता राखावी व वाढवावी , गुणवत्ता वाढली की संख्यात्मकही प्रगती होते.समाजाचे देणे लागतो या भावनेतून घावटे यांनी ही शाळा सुरु केल्याचे ते म्हणाले . पालकांनी विद्यार्थ्यांवर दबाव न आणता त्याला जे आवडते त्यात करीयर घडविण्यासाठी मदत करावी . आपल्या आई वडिलांना विसरु नका असे ते म्हणाले . मोबाईलचा वाढत्या वापराने कुटुंबातील संवाद कमी होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली . संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रा. राजेराम घावटे यांनी संस्थेचा कार्याचा आढावा घेवून यंदाचा वर्षापासून गुरुकुल पध्दतीचे शिक्षण संस्थेत सुरु होणार असल्याचे सांगितले . राहुल पाचर्णे म्हणाले की मोठ्या संख्येने विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहे . नोटरी धर्मेंद्र खांडरे आदीनी  मनोगते व्यक्त केली . सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले . आभार प्रीती देशपांडे यांनी मानले.

    फोटो ओळी - ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल शिरुरच्या सीबीएसई इमारतीचे भूमीपूजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते झाले .