शिरुर दिनांक ( वार्ताहर )वैभवी महिला बचत गट महासंघ व वैभवी महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गृप डान्स स्पर्धे मध्ये रेणुका माता महिला मंडळ प्रितम प्रकाश नगर च्या महिलांनी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले . द्वितीय क्रमांक योगागृप व तृतीय क्रमांक निशा सानप आणि ज्योती भाबड यांनी मिळविले तसेच सोलो डान्स मध्ये पहिल्या क्रमांक प्रतिक्षा बारवकर , दुसरा क्रमांक प्रतिक्षा वेताळ व तिसरा क्रमांक ज्योती जाधव यांचा आला .  उत्तेजनार्थ बक्षीस पुजा पवार आणि गृप प्रमिला गायकवाड सोनू हार्दे आणि ईश्वरी गृप श्रृती रोकडे व तनिष्का चत्तर गृप सलोनी आढाव गृप यांनी मिळविले. यावेळी  समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . सौरभ मास्तोळी, सुलोचना निवृत्ती धुमाळ व  निवृत्ती बाळु धुमाळ ,हौसाबाई रामभाऊ लोखंडे , जयश्री राजेंद्र फाळके , पत्रकार शोभाताई परदेशी आयुर्वेदाचार्य डॉ. स्मिता बिपिन बोरा , प्रियांका अशोक धोत्रे , सुवर्णा सोनवणे , वर्षा बेलोटे ,नंदा सतिश खैरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यावेळी घेण्यात आलेल्या  डान्स  स्पर्धेस  महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . याप्रसंगी  रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर , माजी जिल्हा परिषद सदस्या कोमल वाखारे ,आखिल भारतीय मराठा महासंघाच्या नेत्या शोभनाताई पाचंगे,जिजामाता महिला सहकारी बॅकेच्या संचालिका मनिषा कालेवार , त्याच बरोबर  कुसुम काळे, शशिकला काळे, माजी आदर्श सरपंच वर्षा काळे, सोनाली फंड, स्वाती घावटे, नम्रता गवारे, सातव ताई , मीना गवारे तसेच वैभवी पतसंस्थेच्या अध्यक्षा  आशा यशवंत पाचंगे, उपाध्यक्षा नंदा सतिश खैरे, राजश्री संजय ढमढेरे, संचालिका संगीता केशव धोंगडे, संगीता नामदेव रोकडे, मीरा रोहीदास काळे, आरती अरुण शिंदे , राधा प्रभाकर जाधव, कल्पना विजयकुमार चोभे, निलिमा लक्ष्मीकांत मोहडे तसेच डांन्स स्पर्धेचे  परिक्षक गायत्री सिंग व दिपाली चव्हाण उपस्थित होते . महिलांच्या करीता विविध प्रकारचे प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या व विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली .