एस के एच मेडिकल महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा
बीड प्रतिनिधी माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात माहिती ची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झालेली असताना या प्रचंड मोठ्या माहितीच्या ढिगाऱ्यातून अचूक व जलद गतीने ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी ग्रंथालये ही ज्ञान स्त्रोत म्हणून कार्य करत असल्याचे प्रतिपादन डॉ.पांगारकर यांनी केले.
येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालय ग्रंथालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांची जयंती ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.गणेश पांगारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक शिंदे,डॉ.रावसाहेब हंगे,डॉ वैभव शहापुरे, शेख वसीम,अभिजित थोरबोले उपस्थित होते.
महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.गणेश खेमाडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांगितले की, १२ ऑगस्ट हा दिवस भारतात ग्रंथालय शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिन ग्रंथालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढे बोलताना डाॅ खेमाडे म्हणाले की, ग्रंथालय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारे पाच सूत्र डॉ.रंगनाथन यांनी सांगितली आहेत.ती म्हणजे
ग्रंथ उपयोगासाठी आहेत,प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे,प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे,वाचकाचा वेळ वाचला पाहिजे,ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. या पाच सूत्रांच्या आधारे ग्रंथालयाचे व्यवस्थापन केले जाते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री शिंदे व्ही.जी.यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक ग्रंथपाल उषा राऊत यांनी मानले.