शिरुर : आखिल  भारतीय जैन श्वेतांबर गुजराती महासंघ महिला शाखा समिती शिरूर यांच्या वतीने येणाऱ्या होळीचे औचित्य  साधून परिसरातील  विटभट्टी कामगार महिला व  त्यांच्या  मुलांना कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले तसेच माहेर संस्था शिरूर येथील मुलांनाही कपडे व खाऊ चे वाटप करण्यात आले.

अपर्णा शहा ,मोनिका शहा सोनल शहा,स्मिता शहा,पल्लवी शहा,मयुरी संघवी,हर्षा संघवी ,ऋतू संघवी,रुपाली गांधी ,नैना शहा,जिज्ञा शहा आदी यावेळी  उपस्थित होत्या. सामाजिक बांधिलकी जपून येथून पुढील काळातही  असे विविध  सामाजिक उपक्रम राबविण्याचा  निर्धार शिरूर शाखा समिती कडून करण्यात आला आहे .