शिरूर दिनांक ( वार्ताहर) माझ्या निवडणुकीचे पालक जनताच असून मला जनताच न्याय देईल असे सांगून राज्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांचे आशीर्वाद बीडच्या वेशीत पोहोचतील तेव्हा माझा विजय रथ कोणी रोखू शकणार नाही असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार व माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी शिरूर येथे व्यक्त केला. शिरूरचे माजी आमदार कै.बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालतीताई पाचर्णे व चिरंजीव पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबूराव पाचर्णे यांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर उपस्थितान समोर त्या बोलत होत्या. यावेळी मुंडे म्हणाल्या की बीड मध्ये अनेक जणांच्या उमेदवारीच्या चर्चा झाल्या. अनेक जण म्हणाले आम्ही उमेदवारी करू. बीडच्या माझ्या निवडणुकीची पालक जनता असून ही जनताच आपल्याला न्याय देईल. असे सांगून त्या म्हणाल्या की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर सर्व जाती धर्मांचे लोक प्रेम करतात. बीड जिल्ह्यातील जनता फार हुशार असून ४५ वर्ष सत्तेचा विरोधातील एका नेत्याला या जनतेने सांभाळले व त्या नेत्याने देशपातळी पर्यत काम केले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जातीपातीला थारा नाही असेही त्या म्हणाल्या .