परतूर तालुका येथील ग्रामीण रुग्णालय परतूर येथे 26 जानेवारी 2024 झेंडा वंदन करता वेळेस महात्मा गांधी यांचाच फोटो लावण्यात आला होता आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवली नाही आणि पूजन सुद्धा केले नाही हि बाब समजताच वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी ग्रामीण रुग्णालय परतूर येथे गेले व त्यांनी डॉ दुर्गावाड वैद्यकीय अधिकारी यांना समज देऊन भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली होती आजपर्यंत जवळ जवळ दोन महिने होत आहेत परंतु ग्रामीण रुग्णालय परतूर येथील डॉ दुर्गावाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ऑफिस मध्ये न लावता कपाटात ठेवून दिली होती परंतु आज वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे शहर अध्यक्ष राहुल नाटकर पत्रकार राहुल पाईकराव तेजस भिसे अशोक साबळे हे ग्रामीण रुग्णालय परतूर येथे गेले असता त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा दिसली नाही त्यांनी विचार पुस केली असता कर्मचारी यांनी सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा डॉ दुर्गावाड यांनी कपाटात ठेवली डॉ दुर्गावाड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल एवढा तिरस्कार का वाटतोय अशा डॉ वर कायदेशीर कार्यवाही व्हायला पाहिजे असे मत जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे शहर अध्यक्ष राहुल नाटकर पत्रकार राहुल पाईकराव तेजस भिसे अशोक साबळे यांनी व्यक्त केले
परतूर शहरातील ग्रामीण रुग्णालय परतूर येथील डॉरांचा मनमानी कारभार! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतीमा चक्क कपाटा मध्ये
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/updates/photos/2024/03/nerity_0151b64efb49a50624633876839c0a68.jpg)