शिरुर दिनांक ( वार्ताहर )- सकल समाजाच्या वतीने महिला दिना निमित्त शिरुर नगरपरिषदेच्या कचरा गाड्या वरील कामगारांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले . याबाबतची आधिक माहिती देताना ॲक्टिव्ह सोशल गृपच्या अध्यक्षा कामिनी बाफना यांनी सांगितले की दरवर्षी महिला दिनानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन सकल समाजाचा वतीने करत असतो . यंदाचा वर्षी शिरुर नगरपरीषद मंगलकार्यालयात पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागातील कचरागाडीवरील कामगारांना आरोग्य विषयक मार्गदर्शन डॉ . सारिका बोरा व प्राजक्ता लुनावत यांनी केले शहराची स्वच्छता व आरोग्य चांगले रहावे या करीता स्वच्छता विभागातील कामगार काम करतात या कामगारांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी आरोग्य विषयक मार्गदर्शनाचा उपक्रमाचे आयोजन केल्याचे व या कामगारांना फराळ चे वाटप करण्यात आल्याचे बाफना यांनी सांगितले . या कार्यक्रमासाठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे , पालिकेचे स्वच्छताधिकारी दत्तात्रेय बर्गे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे ही बाफना म्हणाल्या .