शिरुर - शिरुर शहरातील दोन लॉजवर पोलीसांनी कारवाई करत अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे नुसार तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन दोघा जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी दिली आहे . दीपक शंकरलाल उपाध्याय राहणार - सुशीला पार्क शिरूर , विमल बागवान टेलोत वय 42 वर्ष मूळ राहणार- पिंडवाल तालुका आसपुर जिल्हा डोंगरपुर राजस्थान सध्या राहणार - महाराजा लॉज शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे ,अशोक गंगाधर उबाळे वय 50 वर्ष राहणार - साई श्रेयस लॉज शिरूर, ता. शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार - पाराळा, तालुका- अंबड, जिल्हा -जालना या तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी टेलोत व उबाळे यांना अटक करण्यात आली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार ही १२ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली .शहरातील महाराजा लॉजवर दीपक शंकरलाल उपाध्य यांचा सांगण्यावरून विमल भगवान टेलोत हा मुलीसह अनैतिक व्यापार शारीरिक व्यापार करताना मिळून आला . शहरातील साई श्रेयस लॉज येथे ही दीपक शंकरलाल उपाध्याय याचा सांगण्यावरून अशोक गंगाधर उबाळे वय 50 वर्ष राहणार -साई श्रेयस लॉज शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार -पाराळा ,तालुका ,अंबड जिल्हा- जालना हा मुलीसह अनैतिक व्यापार शारीरिक व्यापार करताना आढळून आला .याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन पोपटराव सुद्रिक यांनी फिर्याद दिली आहे . आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करीत आहे . ही कारवाई पोलीस अधीक्षक पकंज देशमुख , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे व पोलीस हवालदार सांगळे,पोलीस हवालदार सुद्रिक पोलीस नाईक भवर,महिला पोलीस प्रतिभा देशमुख ,महिला पोलीस अर्चना यादव यांनी केली .