शिरुर - जगप्रसिध्द उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्या ८५ व्या जयंतीनिमित रसिक विचार मंच यांच्या वतीने शनिवार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प्रसिध्द मोटिव्हेशनल स्पीकर्स व सूत्रसंचालिका रेडिओ जॉकी अनघा मोडक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे . शहरातील जैन पंचायत भवन जुन्या नगरपालिके समोर पुणे -नगर रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे . आजारपणात दृष्टी गमावल्या नंतर हताश व निराश न होता अंधत्वावर मात करीत आयुष्य घडविणा-या मुलाखतकार ,सूत्रसंचालिका , गायक व पत्रकार अनघा मोडक या ' जगण्याचं गाणं होताना ' या विषयावर व्याख्यान देणार आहेत . यावेळी प्रसिध्द उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल , दिनाभाभी धारीवाल यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत . व्याख्यानासाठी मोठ्या संख्येने नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रसिक विचार मंचचा वतीने करण्यात आले आहे .