बिडकीन ( वार्ताहर) पैठण तालुक्यातील श्री. सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन येथे शिक्षक व पालक, विद्यार्थी यांच्या मध्ये सुसंवाद निर्माण होण्यासाठी शासनाच्या नियमानुसार शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर प्रमुख पाहुणे म्हणून मानद मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी उपस्थित होते. प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रत्येक तुकडीतून दोन अशा शिक्षणप्रेमी, उपक्रमशील व अभ्यासू पालकांची निवड करण्यात आली होती.या पालक प्रतिनिधिचे प्रशालेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर यांनी स्वागत केले.यामध्ये पुढीलप्रमाणे शिक्षक पालक संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली.अध्यक्ष मनोहर चित्तोडकर उपाध्यक्ष एकनाथ हिवाळे सचिव ज्ञानेश्वर चाटुपळे व छाया डुबे सहसचिव रेखा तिवाडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ज्ञानेश्वर चाटुपळे यांनी तर आभारप्रदर्शन छाया डुबे यांनी केले. कार्यक्रमाचे सुरेख असे फलकलेखन कलाशिक्षक अनिल साबळे यांनी केले.बैठकीस मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती होती. बैठकीस मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर व मानद मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
MG Motors ने भारत में रजिस्टर कराया Binguo EV का ट्रेडमार्क, जल्द लॉन्च हो सकती है किफायती इलेक्ट्रिक कार
Binguo EV दो अलग-अलग पावरट्रेन विकल्पों के साथ आती है। हालांकि इंडियन मार्केट में इसके...
ખેડબ્રહ્મા નગરપાલિકાનું 18.70 કરોડની પુરાતવાળું બજેટ સર્વાનુંમતે મંજૂર કરાયું
ખેડબ્રહ્મા પાલિકાની 4 જાન્યુઆરીએ કારોબારી સમિતિમાં સને 2023-24 નું બજેટ કારોબારી ચેરમેન બ્રિજેશ...
ડીસામાં આમ આદમી પાર્ટીના પોસ્ટરો ફાડી દેવાતા કાર્યકર્તાઓમાં આક્રોશ....
ડીસામાં આમ આદમી પાર્ટીના પોસ્ટરો ફાડી દેવાતા કાર્યકર્તાઓમાં આક્રોશ....
नीट परीक्षा को लेकर कांग्रेस ने जयपुर में किया प्रदर्शन,डोटासरा ने बोला बड़ा हमला
नीट परीक्षा को लेकर पूरे देश में छात्रों का आक्रोश देखने को मिल रहा है. राजस्थान में इसी बीच...