शिरुर - येथील दिप्ती एंटरप्रायझेसचे प्रमुख व माजी सैनिक फक्कडराव आप्पा काळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्याच्या वाढदिवस माहेर संस्था  व ज्येष्ठ्य समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालयातील मुलांसमवेत साजरा केला . काळे हे तर्डोबावाडीचे असून रांजणगाव गणपती एमआयडीसीतील उद्योजक आहेत . सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेले आहेत परिसरात विविध सामाजिक कार्यात ते सहभागी असतात . माहेर व मनशांती छात्रालयात केक कापून त्यांनी  खाउंचे वाटप केले तसेच माहेर संस्थेतील मुलांसाठी किराणा माल ही त्यांनी दिला . यावेळी रामलिंगचे माजी सरपंच विठ्ठल घावटे ,भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी रेश्मा शेख , राजू शेख , वैशाली ठुबे , माजी सरपंच वर्षा काळे ,व्यवसायिक संजय पोटावळे , ग्रामपंचायत समिती सदस्य विवेक पाडळे , येळे ,कचरु शिंदे , माउली पवार ,चंद्रकांत कनिंगध्वज , महेंद्र ढेरे , संतोष झांबर , शाहीर जालिंधर कुरुंदळे , शंकर गायकवाड आदी उपस्थित होते . विठ्ठल घावटे यावेळी म्हणाले की फक्कडराव काळे हे यशस्वी उद्योजक असून सामाजिक कार्यात ही पुढे असतत . त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नी माजी सरपंच वर्षा काळे यांचे ही मोठे योगदान आहे . वाढदिवसानिमित्त गरजूंना केलेली मदत ही कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले . यावेळी रेश्मा शेख , गणेश सटाले , सतीश धुमाळ यांनी शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंधर कुरुंदळे यांनी केले तर आभार वर्षा काळे यांनी मानले .