शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शहरातील व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर या संस्थेला सीबीएसई बोर्ड दिल्ली यांजकडून इयत्ता बारावी पर्यतच्या शिक्षणाची मान्यता मिळाल्याबद्दल संस्थेचे व स्कूलचे अध्यक्ष विकास सुवालाल पोखरणा यांचा सन्मान करण्यात आला . बोरा महाविद्यालयाचे भुगोल विभागाचे माजी प्रमुख प्रा . चंद्रकांत धापटे , प्राचार्य डॉ .अमोल शहा , रसिक विचार मंचचे संदिप बिहाणी , शिरुर किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विनय संघवी , प्रसिध्द व्यवसायिक विनोद बोथरा , बांधकाम व्यवसायिक अतुल बोथरा , व्यवसायिक राजू लोखंडे , माजी उपसरपंच गणेश खोले , व्यवसायिक  मुकेश संघवी , मनिष कोठारी , समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त सागर नरवडे , भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा प्रमुख राजू शेख आदी यावेळी उपस्थित होते . यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोखरणा यांच्या शाल , पुष्पगुच्छ व पुस्तक देवून सन्मान करण्यात आला . प्रा चंद्रकांत धापटे , विनय संघवी , अतुल बोथरा , आदीनी मनोगते व्यक्त केली . पोखरणा सन्मानाला उत्तर देताना म्हणाले की CBSEची इयत्ता बारावी पर्यंत शिक्षणाची मान्यता असणारी शिरुर मधील व्हिजन स्कुल हे एकमेव स्कूल आहे . शिरुर सारख्या ग्रामीण भागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या हेतूने शिरुर शहरात व्हिजन इंटरनॅशनल स्कूलची मुहुर्तमेढ केली . गुणवत्तापुर्ण शिक्षकवृंद , पालकवर्गाचे सहकार्य याद्ववारे संस्थेने अल्पावधीत स्वंत :चे एक वेगळे स्थान शिरुरचा शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केल्याचे पोखरणा म्हणाले . भविष्यात उच्च शिक्षणासंदर्भातील विविध अभ्यासक्रम सुरु करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येणार आहे .