शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शहरातील व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर या संस्थेला सीबीएसई बोर्ड दिल्ली यांजकडून इयत्ता बारावी पर्यतच्या शिक्षणाची मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थेचे व स्कूलचे अध्यक्ष विकास सुवालाल पोखरणा यांनी दिली आहे . त्यांनी सांगितले की CBSEची इयत्ता बारावी पर्यंत शिक्षणाची मान्यता असणारी शिरुर मधील व्हिजन स्कुल हे एकमेव स्कूल आहे . शिरुर सारख्या ग्रामीण भागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या हेतूने शिरुर शहरात व्हिजन इंटरनॅशनल स्कूलची मुहुर्तमेढ केली . गुणवत्तापुर्ण शिक्षकवृंद , पालकवर्गाचे सहकार्य याद्ववारे संस्थेने अल्पावधीत स्वंत :चे एक वेगळे स्थान शिरुरचा शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केल्याचे पोखरणा म्हणाले . भविष्यात उच्च शिक्षणासंदर्भातील विविध अभ्यासक्रम सुरु करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पोखरणा म्हणाले .