गुरुवार दि.११ ॲागस्ट २०२२ रोजी रक्षाबंधनाचे औचित्य साधुन काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोखा उपक्रम राबवून ,
तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या संकल्पनेतुन सलग सहाव्या वर्षी पोलीस स्टेशन मुरबाड,आणि तहसील कार्यालय मुरबाड आदीं सरकारी कार्यालयात चक्क अधिकारी आणि कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. गेल्या सहा वर्षांपासून हा कार्यक्रम न चुकता साजरा करण्यात येतो. यंदाही तो सालाबादप्रमाणे करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन किसान काँग्रेसचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे, ओबीसी काँग्रेस प्रदेश सहसचिव ॲड. दिनेश सासे, सदरचा उपक्रम काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा संध्या कदम, तालुका पदाधिकारी नंदा टोहके, तालुका सचिव भगवान तारमले आदींच्या सहका-याने साजरा करण्यात आला. यावेळी बाहेर गावावरुन कार्यरत असलेले अधिकारी-कर्मचारी हे सुट्ट्यां अभावी असे सणवार घरी जावुन आपला परिवारासोबत साजरा करु शकत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष आपली नैतिक जबाबदारी समजुन रक्षाबंधन सारखे उपक्रम मागील सहा वर्षापासुन साजरा करत असल्याचे चेतनसिंह पवार यांनी मत व्यक्त केले. विविध प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम श्री. पवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष करत असतो, आजचा कार्यक्रम हा आमच्या सारख्या अधिकारी-कर्मचारी यांच्या बरोबर नात तयार करुन तालुक्यांतील नागरिक हे आमच्यासोबत असल्याची भावना तयार होते. असे मत वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे यांनी व्यक्त केले. तर सामान्य नागरिकांच्या कामासाठी प्रशासनाच्या विरोधात असलेले काँग्रेस पक्षांनी सदरचा उपक्रम राबुन व्यतिगत पातळीवरचा विरोध नसल्याचे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातुन दाखवल्याचे मत तहसिलदार संदीप आवारी यांनी व्यक्त केले. सदरचा उपक्रम तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार हे महिला काँग्रेसच्या माध्यमातुन राबवून सामान्य महिलांना अधिकारी-कर्मचारी वर्गाबरोबर चर्चा करण्याचे माध्यम उपलब्ध करुन देत असल्याचे प्रतिपादन संध्या कदम यांनी व्यक्त केले.