संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या बारवी धरणाने यंदा ठाणे जिल्ह्याला दिलासा दिला आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्यांदाच १५ ऑगस्ट च्या आधी हे धरण भरले आहे. ११ पैकी धरणाचे आठ स्वयंचलित दरवाजे उघडले आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण शंभर टक्के भरले असून गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान धरणाच्या अकरा दरवाजे पैकी आठ दरवाजे उघडले गेले आहेत. हे सर्व दरवाजे स्वयंचलित असल्यामुळे धरणात पाण्याचा साठा वाढल्यास या धरणाचे सर्वच्या सर्व अकरा दरवाजे उघडले जाणार आहेत. धरण भरल्याने आता धरणात ३३४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरणातून ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण एमआयडीसी क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांना देखील पाणी पुरवठा केला जातो. गुरुवारी सकाळी धरणाच्या पाण्याची पातळी तपासली असता सकाळी धरण ९८ टक्के भरले होते आणि सायंकाळी पाच वाजता हे धरण भरून वाहू लागले. बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे बारावी व उल्हास नदीकिनारी असलेल्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
निमगाव म्हाळुंगीतील कामिनी नदीला पुर
-नागरिक व शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
निमगाव म्हाळुंगीतील कामिनी नदीला पुर
पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिक व शालेय विद्यार्थ्यांचा...
দেশৰ প্ৰধানমন্ত্ৰী নৰেন্দ্ৰ মোদীৰ ৰেডিঅ’ অনুষ্ঠান “মন কী বাত” উপভোগ কৰে মন্ত্ৰী বিমল বৰাই।
আজি প্ৰধানমন্ত্ৰী নৰেন্দ্ৰ মোডীয়ে মন কী বাত অনুষ্ঠান সম্বোধন কৰে। টিংখাং চাহ বাগিচাৰ অন্তৰ্গত ১৪৮...
18 September 2022
মাজুলী কমলাবাৰীত গুমৰাগ নৃত্যৰ মনোমোহা পৰিবেশ
18 September 2022
কমলাবাৰীত বৰ্নিল পৰিবেশ গুমৰাগৰ চন্দ্ৰত মুখৰিত সাংস্কৃতিক কাৰ্যালয়ৰ কক্ষ। ৪০০...
રાજ્યની ૬ર નગરપાલિકાઓને રોડ રિસરફેસીંગ માટે ૯૭ કરોડ રૂપિયા વધારાની ગ્રાન્ટ ફાળવતા મુખ્યમંત્રી શ્રી ભૂપેન્દ્ર પટેલ
ચોમાસામાં અતિભારે વરસાદથી નુકશાન પામેલા શહેરી વિસ્તારોના માર્ગોને તાત્કાલિક રીપેર કરી નાગરિક...