वैजापूर :- बहुजन समाज पार्टीच्या वतीने श्रीरामपूर येथील मातंग समाजाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कड्क कारवाई करण्यात यावी तसेच त्याला पाठीशी घालून मदत करणाऱ्या पोलीस निरीक्षकास तत्काळ निलंबित करून  ॲट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अश्या मागणीचे निवेदन बहुजन पार्टीच्या वतीने नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांना देण्यात आले.यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे,शहर अध्यक्ष ऋषिकेश त्रिभुवन,राजेश नरवडे, बाळु शिनगारे,वाल्मीक वाघ,सचिन निकम, लहानु त्रिभुवन यांनी निवेदन देऊन निषेध दर्शवला.