जामखेड ( प्रतिनिधी )११ ऑगस्ट जामखेड तालुक्यातील आपटी येथील महाराष्ट्र शासनाच्या १ ९४७-४८ मधील वीरचक्र पुरस्काराचे मानकरी मच्छिद्र कडू पाटील यांचे जामखेड शहरात स्मारक व्हावे अशी मागणी आपटी येथील उपसरपंच आप्पासाहेब ढगे यांनी केली आहे.
जामखेड तालुक्यातील आपटी या गावी एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये दि. २४ नोव्हेंबर १९२३ रोजी मच्छिंद्र कडू यांचा जन्म झाला. त्यांनी अगदी लहानपणीच स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला व. शिक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नव्हती. एका सुट्टीवर आलेल्या जवानाच्या मार्गदर्शनाने मच्छिद्र कडू दि. २३ नोव्हेंबर १९४३ मध्ये सैन्यात भरती झाले. त्यावेळी देश पारतंत्र्यात होता. पुढे १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला आणि हिंदुस्थानची फाळणी झाली.
त्यावेळी सप्टेंबर, १९४८ च्या युद्धात अतुलनीय शौर्याबद्दल गाव आपटी , जामखेड , अ . नगर चे सुपुत्र " नायक मच्छिंद्र रामभाऊ कडू " यांना " वीर चक्र " पुरस्काराने १९ ५० ला सन्मानित करण्यात आले होते.
सद्या स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्षानिमित्त आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येत आहे. याच अनुषंगाने वीरचक्र पुरस्काराचे मानकरी मच्छिद्र कडू पाटील यांचे जामखेड शहरात स्मारक व्हावे अशी मागणी आपटी येथील उपसरपंच आप्पासाहेब ढगे यांनी केली आहे. याबाबत आपण माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे व संबंधित यंत्रणेकडे रितसर मागणी करणार असल्याचेही ढगे यांनी सांगितले.