शिरूर:भाजपाचे शिरूर लोकसभा संयोजक ॲड.धर्मेंद्र खांडरे यांची शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुकी करण्यात आली आहे . अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केलेल्या खांडरे यांनी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.पक्षासाठी झोकून देऊन निस्वार्थीपणे काम करीत असल्याने त्यांना पक्षाने वेळोवेळी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.नुकतीच महत्त्वाच्या अशा शिरूर लोकसभा मतदार संघातून पक्षाचे  राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.शिरूर लोकसभा संयोजक म्हणूनही ते कार्यरत आहेत.प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुकाणू  समितीने नुकतीच त्यांची जिल्हा  अंमलबजावणी समितीवर नियुक्ती केली आहे. पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस, बाबुराव दौंडकर समिती अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश विधी आघाडी प्रभारी अशा विविध पदांवर ते कार्यरत आहेत.पक्षाने आतापर्यंत त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या खांडरे हे प्रामाणिकपणे पार पाडत असल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे.