वाळूच्या हायवाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा चिरडले,

"पैठण तालुक्यातील मुरमा फाट्यावरील घटना"

पाचोड (विजय चिडे) बीड कडून भरधाव वेगात धावणार्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवाने धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाटा येथे पायीं रस्तावर ओलांडणाऱ्या एका महिलेला चिडल्याची धक्कादायक घटना शनिवारी ( दि.१७)रोजी रात्री पावणे अकरावाजेच्या सुमारास घडली असून द्वारकाबाई दादाराव बर्डे (वय 50 )रा.हिवरा चौंढाळा असे अपघातात मृत्यू झालेल्या महीलेच नांव आहे. या घटनेची नोंद अद्यापही पाचोड पोलिस ठाण्यांत झालेली नाही.

याविषयी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  पैठण तालुक्यातील हिवरा चौंढाळा येथील द्वारकाबाई दादाराव बर्डे या पंढरपूर येथे दर्शनासाठी गेल्या होत्या, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दर्शन करून पाचोड येथे बसने दाखल झाला, यानंतर घरी जाण्यासाठी त्यांनी दुचाकी बोलून घेऊन त्या दुचाकीवरून हिवरा चौंढाळा येथे निघाल्या, मात्र त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल संपले असल्याने दुचाकीस्वार पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंप वरती गेले होते, यावेळी द्वारकाबाई दादाराव बर्डे या धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाटा येथे पायीं रस्तावर ओलांडत असताना त्यांना बीडकडून भरधाव वेगाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने उडून दिले आहे, त्यावेळी द्वारकाबाई बर्डे यांना या वाळूच्या हायवाने जवळपास शंभर ते दीडशे फूट फरफडत नेले, यामुळे त्यांच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या आहेत. हा अपघात घडतात हायवा चालक हा घटनास्थळी न थांबता घटनास्थळावरून वाळूने भरलेला हायवा घेऊन पसार झाला आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ भोकरवाडी येथील रुग्णवाहिकेला दिली असतां रुग्णवाहिकेवरील कर्मचारी विजय धारकर ,विठ्ठल गायकवाड, गणेश चेडे या नेतात काय घटनास्थळी दाखल होऊन जखमी महिलेला तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.आसाराम चौरे यांनी द्वारकाबाई यांना मृत घोषित केले आहे.