बीड जिल्ह्यातील व बीड तालुक्यातील बंजारा समाज बांधवांवर राज्याचे माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचा दृढ विश्वास असून बंजारा समाजाच्या अडी अडचणी सोडविण्याचे काम आजतागायत आण्णांनी केले आहे.बीड शहरांमध्ये स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांचा पुतळा उभा करून अण्णांनी या समाजावर असलेली बांधिलकी पूर्णत्वास नेलेली आहे ज्या ज्या ठिकाणी बंजारा समाजाचे तांडे आहेत त्या त्या ठिकाणी रस्ता ,प्राथमिक सुविधा तसेच लाईटची व्यवस्था जाणीवपूर्वक लक्ष देऊन पूर्ण केलेले आहे बीड शहरांमध्ये बंजारा भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर तेही काम येणाऱ्या काळात आपण पूर्ण करू असेही आश्वासन अण्णांनी वेळोवेळी दिलेला आहे.आज राष्ट्रसंत तथा बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती संत सेवालाल चौक जालना रोड बीड या ठिकाणी संपन्न झाली यावेळेस जयदत्त आण्णांचे स्वीय सहाय्यक गिरीश देशपांडे यांनी वरील उद्गार काढले.

या कार्यक्रमासाठी बीड शहरातील व ग्रामीण भागातील हजारो बंजारा समाज बांधव उपस्थित होते यामध्ये माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण,मजूर फेडरेशनचे संचालक अंकुश राठोड, जिल्हा कृषी अधिकारी जेजुरकर साहेब,बीड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साळुंखे साहेब त्याचबरोबर माजीमंत्री क्षीरसागर यांचे पी ए अशोक जाधव, पी आर ओ पत्रकार प्रशांत सुलाखे,वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष बिभीषण राठोड, तसेच ज्येष्ठ नेते बाबुशेठ लोढा,भुषण पवार,पत्रकार नितीन चव्हाण, राहुल राठोड, शिवलाल राठोड,सुभाष क्षीरसागर,संचालक आनंद शिरसागर, प्रवीण सुरवसे,प्रकाश राठोड,राजेश जाधव,प्राचार्य राजेश कुमार राठोड,डॉ.जगन्नाथ चव्हाण,नवनाथ राठोड ,ज्ञानेश्वर राठोड आधी बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व उपस्थित बांधवांनी संत सेवालाल यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.