प्रतिनिधी । बीड/मुंबई फोटो 

दि.१५ : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी पुजा अशोक मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १५फेब्रुवारी रोजी मुंबईत येथे झालेल्या मेळायात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मा. शरद पवारांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. कुठल्याही पक्षाच्या किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी महिलेची नियुक्ती होण्याची महाराष्ट्रातील ही पहीलीच वेळ आहे. 

पुजा मोरे यांनी वयाच्या 21 व्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडणूक लढवलेली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेत काम केले. त्यांनी केलेली आक्रमक आंदोलने, वकृत्व यामुळे त्या महाराष्ट्राला परिचित झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुजा मोरे यांची ह्याच आंदोलनांमुळे शरद पवार साहेबांच्या नजरेतून पुजा मोरे सुटल्या नाहीत, असे वक्तव्य ही काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. या पदग्रहण सोहळ्यावेळी श्री. शरद पवार,राष्ट्रीय कार्याध्यक्ष सौ. सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ. फौजिया खान, मा.आ.सौ. विद्याताई चव्हाण,राज्यसभा खा. सौ. वंदना चव्हाण, आ. राजेश भैय्या टोपे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. अनिल देशमुख, आ.श्री. एकनाथ खडसे साहेब, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रोहिणीताई खडसे, युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख उपस्थित होते.

*पूजा मोरे मातीतली पोरगी पवारांनी शोधून काढली - जितेंद्र आव्हाड*

पूजा मोरे ही मातीतली पोरगी आहे. हिला शरद पवार साहेबांनी ओळखले. ती हिरा आहे पण तिला तिची जागा देण्याचं काम पवार साहेबांनी केले. युवती, महिला हे सोडून शेतकरी सेलची जबाबदारी तिच्यावर टाकली शरद पवारांचे हेच वेगळेपण आहे, असे आ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.

*स्त्रीला सुद्बा योग्य संधी दिल्यास ती कर्तुत्व गाजवू शकते - शरद पवार*

स्त्री आणि पुरूष यामध्ये कुठल्याही प्रकारे अंतर न ठेवता त्यांना न्याय दिला पाहीजे. कर्तृत्व दाखवण्याची क्षमता फक्त पुरुषाकडेच असते हे काही खरे नाही. स्त्रीला सुद्बा योग्य संधी दिल्यास ती कर्तृत्व गाजवू शकते, असा विश्वासही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.