बीड प्रतिनिधी - मौजवाडी तालुका जिल्हा बीड गावात ईसम नामे- छगन सौदागर चव्हाण हा देशी विदेशी दारू विकत असल्याची बातमी पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी त्याचेवर छापा मारला असता त्याचे ताब्यातुन 6,280/-रु.चा विनापरवाना बेकायदेशीर रित्या देशी विदेशी दारूचा साठा करून त्याची चोरटी विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध पोलीस ठाणे पिंपळनेर येथे दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कामगिरी श्री.संतोष साबळे पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली PSI राडकर,Asi तुळशीराम जगताप,ASI खेडकर,पोलीस हवालदार पी.टी.चव्हाण,राहुल शिंदे,तुषार गायकवाड़,चालक पोकाँ.राठोड यांनी केली आहे. सदर कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.