हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 5 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा एक निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने आपल्या बैठकीमध्ये काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये (Retirement Age) वाढ केली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय (Government Employees) सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसे पाहायला गेले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या देखील सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.Hello MaharashtraMenu

राज्य शासनातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 5 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा एक निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने आपल्या बैठकीमध्ये काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये (Retirement Age) वाढ केली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय (Government Employees) सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसे पाहायला गेले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या देखील सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढले?

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी विद्यापीठाअंतर्गत शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजेच राज्य सरकारने शासनातील सर्वच कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केलेले नाही. मात्र कृषी विद्यापीठ अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कृषी शिक्षक सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासंदर्भात सरकारकडे मागणी करत होते. आता हीच त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे वय देखील 60 वर्षे करण्यात आले आहे. परंतु यामध्ये राज्यातील

अ, ब आणि क संवर्गात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वर्ष इतकेच आहे. हे कर्मचारी देखील सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासाठी सरकारकडे मागणी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय जास्त असताना राज्यशास्त्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय देखील वाढवण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता याबाबत सरकार कोणत्या निर्णय घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.