शिरुर  : हुडको कॉलनी येथील सेवानिवृत्त बालवाडी शिक्षीका शालिनी हिंदुराव शिंदे वय ७० यांच्यावर शोकाकूल वातावरणात अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . शिंदे या बालवाडी शिक्षिका व विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग घेत . गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या .१ फेबृवारीला उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले . शिंदे यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता . माजी नगरसेवक व्यवसायिक विजय दुगड यावेळी श्रध्दांजली वाहताना म्हणाले की शिंदे कुटुंबियांचे शहराचा शौक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे . जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर ,मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे , आटपाटीचे अरुण गायकवाड ,महाराष्ट्र पॅथालॉजीचे पदाधिकारी मोहन मिटकरी , भाजपाचे माजी नगरसेवक नितीन पाचर्णे , बालरोगतज्ञ डॉ विक्रम घावटे , रयत शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक , शिरुर नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य जयवंत साळुंखे , विद्याधाम प्रशालेतील प्रा . देशपांडे महाराष्ट्र साहित्य परिषद शिरुरचे उपाध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ आदीनी यावेळी श्रध्दांजली वाहिली . यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगुंटीवार यांचे ओएसडी डॉ . सुनील शेळके , ससूनचे उपअधीक्षक डॉ . सुजीत दिवारे ,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे , राजेंद्र क्षीरसागर ,माजी नगराध्यक्षा अलका सरोदे , शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य धरमचंद फुलफगर , शिरीष बरमेचा , डॉ किरण तरटे , डॉ . राहुलदत्त पाटील , डॉ. राहूल घावटे , डॉ . स्वप्नील भालेकर ,डॉ .अमित कर्नावट ,डॉ .पंकज रोटे ,डॉ . सतीश आंधळे ,डॉ. जीवन खोसे ,डॉ . आनंद क्षीरसागर , डॉ . रश्मी पाटील , ग्रामीण रुग्णालयाचे डॉ . तुषार पाटील , व्यवसायिक प्रा . डॉ .राजेराम घावटे, विकास पोखरणा , सेवानिवृत्त शासकीय आधिकारी विजय घावटे , पोस्ट मास्टर अमोल साळवी ,माजी सभापती राजेंद्र जाधवराव ,उपसरपंच बाबाजी वर्पे , माजी उपसरपंच संजय शिंदे यांचासह रयत शाळा व विद्याधाम प्रशालेतील आजीj माजी शिक्षक , विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .

रयत शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक हिंदूराव शिंदे यांच्या त्या पत्नी होत तर व्यवसायिक व शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रशांत शिंदे ,विद्याधाम प्रशालेतील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा .प्रसाद शिंदे , समर्थ पॅथालॉजीचे प्रमुख व समस्त मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त डॉ . उदय शिंदे यांच्या त्या मातोश्री होत .