शिरूर :  माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे यांच्या वतीने आयोजित नगराध्यक्ष प्रकाशशेठ रसिकलाल धारीवाल (पीआरडी) चषक टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेत संकल्प प्रतिष्ठान मंचर संघाने प्रथम क्रमांक मिळवून पी आर डी चषक व एक लाख ११ हजार रुपयांचे  बक्षिस प्राप्त केले . द्वितीय क्रमांक चा मानकरी टी -20 स्पोर्ट बेल्हा ठरला तर संपूर्ण सामन्याचा आदित्य धारीवाल मॅन ऑफ द सिरीज इलेक्ट्रिक मोटर सायकलचा विशाल निगोट मानकरी ठरला आहे. शिरूर येथे माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रशांत शिंदे यांच्या वतीने उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल व शिवसेवा सचिव स्वर्गीय केशरसिंग खुशाल सिंग परदेशी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा होते . स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्योगपती तथा शिरूर नगरपरिषद सभागृह नेते प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या हस्ते झाले . यावेळी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार,हिंगोली चे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, शिवसेवा मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास परदेशी, माजी नगरसेवक संतोष भंडारी, संपदा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर डेरे , उद्योजक सुभाष गांधी, संतोष कडेकर, डॉ.संतोष पोटे, अमोल भोसले, उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर,रंजन झांबरे, माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार , ,स्पर्धेचे आयोजक रविंद्र ढोबळे ,स्पर्धेचे संयोजक प्रशांत शिंदे, श्रीहरी नरवडे, मयुर नहार,रवींद्र खांडरे, मितेश गादिया संजय ढमढेरे, , फिरोज शेख ,संतोष शिंतोळे, समालोचक नरेश ढोमे,फिरोज भाई बागवान ,दत्ता पवार, ,गुलाम पठाण ,रविंद्र जाधव , सागर ढवळे ,राहुल पवार सनी दळवी , दगडू त्रिमुखे, अमोल पवार बाळासाहेब साळवे, पोपट चव्हाण,राजेंद्र ढोबळे विजय ढोबळे अजय ढोबळे तुषार माने ऋतिक ढोबळे तेजस माने, रवींद्र गुळादे, राजेंद्र माने , तुषार माने, चेतन माने ,संतोष माने , कुणाल धाडीवाल, निलेश पवार, यश ढोबळे, अनुराग ढोबळे, ओम ढोबळे, आदी उपस्थित होते.. स्पर्धेत प्रथम क्रमांक संकल्प प्रतिष्ठान मंचर यांना एक लाख अकरा हजार रुपये , द्वितीय क्रमांक टी 20 पोर्ट क्लब बेल्हा ७५ हजार रुपये , तृतीय क्रमांक साईराम 11 शिरूर यांना ६१ हजार रुपये , चतुर्थ क्रमांक महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर यांना ४१ हजार रुपयेचे बक्षिस मिळाले . उद्योगपती आदित्य धारीवाल मॅन ऑफ द सिरीज हिरो होंडा मोटरसायकलचा मानकरी विशाल निगोट ठरला, उत्कृष्ट फलंदाज संदीप गायकवाड यास एलईडी टीव्ही, उत्कृष्ट गोलंदाज अजू बेपारी यास एलईडी टीव्ही, उत्कृष्ट किपर सनी दळवी, उत्कृष्ट झेल सतिश गावडे , सलग तीन विकेट प्रमोद बोऱ्हाडे, सलग तीन षटकार विशाल नीगोट, सलग तीन चौकार अभी खंडागळे या पाचही जणांना सायकल भेट देण्यात आली. यावेळी स्वागत रवींद्र ढोबळे , स्वागत प्रशांत शिंदे सर,आभार जयवंत साळुंखे यांनी मानले. शिरूर सारख्या शहरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिशय सुंदर उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारीवाल पी आर डी चषक क्रिकेट स्पर्धा भरवून शिरूर शहराचा नावलौकिक संपूर्ण राज्यात पोहोचवण्याचे काम माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे , प्रशांत शिंदे यांनी केले असल्याचे मत उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल यांनी यांनी व्यक्त केले. शिरूर येथे भरवलेल्या पीआरडी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये या क्रिकेट स्पर्धेत ऑनलाईन युट्युब वर प्रक्षेपण ठेवण्यात आले होते . तर मैदानात लावलेली एलईडी स्क्रीनवर थेट सामन्याचे प्रक्षेपण, रयत शिक्षण संस्था शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सुंदर प्रकारच्या गॅलरीज सुंदर प्रकारचे स्टेडियम सजवण्यात आली होती यामुळे या स्टेडियम आयपीएल सारखा भास जाणवत होता या स्पर्धा पाहण्यासाठी शिरूर श्रीगोंदा पारनेर हवेली या तालुक्यातून हजारो नागरिक उपस्थित होते. .