वैजापूर शैलेंद्र खैरमोडे
:- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे आ.अंबादास दानवे यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना तालुका शाखेच्यावतीने मंगळवारी (9) येथे त्यांचे जोरदार स्वागत व सत्कार करण्यात आले. तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी संख्येने उपस्थिती होती.
आ.दानवे हे मुंबईहून औरंगाबादकडे जात असतांना आज सकाळी वैजापूर शहरात त्यांचे शिवसैनिकांनी भव्य स्वागत व सत्कार केले. शहरात आगमन झाल्यानंतर आ.दानवे यांनी सर्वप्रथम शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय आर.एम.वाणी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशिर्वाद घेतले तसेच वाणी कुटुंबियांशी चर्चा केली.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात आ.दानवे यांचे उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जंगी स्वागत व सत्कार केला.यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते विधिज्ञ आसाराम पाटील रोठे, ॲड प्रदीप बत्तासे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, शहरप्रमुख प्रकाश पाटील चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, किसान सेना जिल्हाप्रमुख संजय पाटील निकम, महिला आघाडीच्या आनंदीबाई अन्नदाते, वर्षाताई जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा लता पगारे, बाजार समितीचे संचालक दिगंबर खंडागळे, भाऊसाहेब पाटील गलांडे, उपतालुकाप्रमुख मोहनराव साळुंके, माजी तालुकाप्रमुख बबनराव जाधव, सिताराम पाटील भराडे, डॉ प्रकाश शेळके, भीमाशंकर तांबे, नंदकिशोर जाधव, राजेंद्र हुमे, रावसाहेब मोटे, रमेश सावंत, माजी नगरसेवक रमेश पाटील हाडोळे, देविदास वाणी, प्रवीण सोनवणे, किशोर हुमे, सचिन गरड, कैलास हिवाळे, बाळासाहेब बडक, खंडू पाटील गाढे, रवींद्र पगारे, अरविंद साळुंके, कैलास वाणी, युवासेनेचे अनिल न्हावले, गोरख गावडे, उमेश शिंदे, विठ्ठल डमळे, अक्षय साठे, राहुल साळुंके, संकेत वाणी, ऋषिकेश राजपूत, बाबासाहेब महाजन, ज्ञानेश्वर मोटे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.