पाचोडच्या शिवछत्रपती महाविद्यालयास नॅक मूल्यांकनामध्ये बी प्लस ग्रेड..
पाचोड (विजय चिडे) श्री ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, शिवछत्रपती महाविद्यालयाचे दिनांक २० व २१ मार्च रोजी मूल्यमापन झाले. या समितीचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. जयप्रकाश त्रिवेदी (गुजरात), प्रोफेसर डॉ. दिवाकर सिंग राजपूत ( मध्य प्रदेश) प्राचार्य डॉ. मनोज कामत (गोवा) यांची राष्ट्रीय मूल्यांकन परिषद नॅक बेंगलोर समितीने नियुक्त केलेल्या सदस्यांनी महाविद्यालयाचे मूल्यमापन केले. या मूल्यमापनामध्ये महाविद्यालयाचे मागील पाच वर्षातील शैक्षणिक व विद्यार्थी पूरक उपक्रमांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात आले.
महाविद्यालयातील सर्व विभाग, विद्यार्थी पूरक उपक्रम, माजी विद्यार्थी व पालक, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीच्या विविध सेवा सुविधा यासंबंधी मूल्यमापन झाले. या मूल्यमापनातून महाविद्यालयाने ग्रामीण भागामध्ये सीजीपीए २.५९ बी प्लस ग्रेड प्राप्त केला हे विशेष होय. आणखी विशेष म्हणजे शिवछत्रपती महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र करियर कट्टा अंतर्गत महाविद्यालयास राज्यस्तरीय उत्कृष्ट तृतीय तर उत्कृष्ट प्राचार्य चंद्रसेन कोठावळे यांना राज्यस्तरीय सर्व द्वितीय पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. यामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महाविद्यालयाने प्रथम मूल्यांकनामध्ये मिळवलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तसेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान पाटील भुमरे, संस्थाध्यक्ष राजू नाना भुमरे, संचालक मा. सभापती विलास बापू भुमरे पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे व सर्व संचालक मंडळाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे तसेच नॅक समन्वयक प्रा. संदीप सातोनकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी तसेच विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि पत्रकार या सर्वांचे अभिनंदन केले व भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो _शिवछत्रपती महाविद्यालयात नॅक पियर टीम समवेत संस्थाध्यक्ष राजू नाना पाटील भुमरे , प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे नॅक ्समन्वयक प्रा. संदीप सातोनकर प्राध्यापक वर्ग व कर्मचारी आदी.
छायाचित्र-विजय चिडे, पाचोड