सलग सहावेळा शिरूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणारे आणि त्यातील दोन वेळा विजय प्राप्त करणारे माजी आमदार बाबूराव काशीनाथ पाचर्णे (वय ७१) यांचे दीर्घ आजाराने आज येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले पूत्र राहुल पाचर्णे, एक मुलगी, जावई कर्नल महेश शेळके, नातवंडे, चार भाऊ, पाच बहिणी असा परिवार आहे. पाचर्णे यांच्या निधनाने शिरूर तालुक्यावर व विशेषतः शिरूर पंचक्रोशीवर शोककळा पसरली.