शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शहरातील प्रीतमप्रकाश नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचा प्रथम वर्धाप वर्धापन दिन उत्सव उत्सहात साजरा करण्यात आला यानिमित्त मंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली होती व महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते . स्वामी समर्थ मंदिर वर्धापनदिनानिमित्त भागवताचार्य ह.भ.प. वैशालीताई शेंडे पिंपळनेरकर यांचे किर्तन झाले . पतिसरातून श्री. स्वामी समर्थ पालखी मिरवणुक श्री स्वामी समर्थाचा जयघोषात काढण्यात आली . सायंकाळी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री. स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांनी दिली. यावेळी सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश प्रकाश वाळकीकर , उपाध्यक्ष ॲड . नारायण सिताराम पवार ,सचिव दिपक रामचंद्र वर्मा , खजिनदार गणेश पोपटराव घाटगे , कार्यकारी सदस्य संपत बाळकृष्ण लोखंडे , सचिन रामदास गुंजाळ , चंद्रकांत भिमाजी निघोजकर , विष्णु नारायण वेताळ, , प्रभावती प्रमोद पवार , भूषण विजय कडेकर , मंगलाताई नविनचंद्र बागमार आदी सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .