अमरावती :- आझाद हिंद सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात 23 जानेवारी 2024 ला उपायुक्त संजय पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.