शिरूर - शहरातील लाटेआळी येथील शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक-१च्या इमारतीचा कामाचे भूमिपूजन २६ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विशेष प्रयत्नांतून हे काम मंजूर झाले असून ३ कोटी २५ लाख रुपयेचे हे काम आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व शिरूर नगरपरिषदेचे माजी सभागृह नेते व प्रसिद्ध उद्योजक प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता लाटेआळीतील शिरूर नगरपरिषदे शाळा क्रमांक -१ याठिकाणी होणार असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात यांनी सांगितले. थोरात यांनी सांगितले की १७० वर्षापूर्वी महात्मा जोतीराव फुले यांनी लाटेआळी याठिकाणी शाळा सुरु केली होती. लाटेआळीतील या शाळेच्या इमारतीचे डिझाईन हे पुण्यातील तांबोळी असोसीएट यांनी तयार केले आहे. या इमारतीचा तळमजला वर शाळेचे क़्लासरुम व बहुउद्देशीय हॉल असणार आहे. त्याखेरीज इमारतीत ग्रंथालय, संगणक प्रयोग शाळा, विज्ञान प्रयोगशाळा, मुख्याध्यापक कार्यालय, स्टापरूम, मुला मुलींसाठी स्वंतत्र स्वच्छतागृह असणार आहे. त्याच बरोबर माजी खासदार आढळराव यांनी शासनाकडे शिरूर नगरपरिषदेच्या विद्युत विषयक कामांसाठी हायड्रोलिक शिडी असणारे २५ लाख रुपये किमंतीचे वाहन व भुयारी गटारीचा स्वच्छतेसाठी जेटिंग असलेलेले ३५ लाख रुपये किमन्तीचा चारचाकीवाहन मिळविण्यासाठी पाठपुरावा करून ही वाहने ही उपलब्ध करून दिली असून त्याच्या ही लोकापर्ण सोहळा संपन्न होणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.