औरंगाबाद :- शैलेंद्र खैरमोडे 

फुलंब्री तालुक्यात चोरीच्या अनेक घटना घडल्या असून,त्यामध्ये अनेक लोकांच्या सोन्या, चांदीचे, दागिने, तसेच अनेक वाहनांच्या चोऱ्या,व यापलीकडे जाऊन चोरट्यानी जनावरे चोरण्याच्या घटना देखील घडल्या आहेत,वडोदबाजार पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही महिन्यांपूर्वी वाहन चोरट्यान पकडून पोलिसांनी त्यांच्या कडून गाड्या जप्त केल्या होत्या,यानंतर परिसरात चोरीच्या घटना जवळजवळ बंद झाल्या होत्या,मात्र आता काही संधी साधू चोरटे मोठ्या कार्यक्रमामध्ये चोरी करण्यासाठी सरसावले असल्याचे या दोन घटनेतून दिसून आले आहे,मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिल्लोड येथे विविध विकास कामाच्या उदघाटना प्रसंगी आले असता त्यांचा फुलंब्री शहरासह ग्रामीण भागातील महत्वाच्या गावाच्या फाट्यावर त्याचा ग्रामस्था च्या वतीने सत्कार करण्यात आला होता,त्यावेळी पाल फाटा येथे त्यांचा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा अर्थ बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या वतीने पाल फाटा येथे जाहीर सत्कार कार्यक्रम राबण्यात आला होता,त्यावेळी चोरत्यानी गर्दीचा फायदा घेत पाल येथील राजू गणपत ढेपले यांच्या खिशातून 35 हजार रुपये रोख रक्कम लाबवली होती.तसेच पाथ्री येथील योगेश बनसोड यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरट्यान लाबवली होती.फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती,मागच्या चोरीच्या घटनेचा उलगडा झाला नव्हता तोच दि 10 रोजी फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजी महाराज हे आले असताना,त्यांच्या स्वागतासाठी फुलंब्री शहरामध्ये पंचक्रोशीतील तमाम शिवप्रेमी नि मोठी गर्दी केली होती.या गर्दीचा फायदा घेत फुलंब्री शहरातील नामकीत व्यापारी मुकेश शांतीलाल काला यांच्या गळ्यातली अडीच तोळे सोन्याची 80 हजार रुपये किमतीची चेन चोरट्यान लाबवली असून,ही बाब मुकेश काला यांच्या लक्षात येताच त्यांनी फुलंब्री पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे,सदरील दोन्ही मोठ्या कार्यक्रमाचा फायदा घेत,चोरत्यानी संधी साधून एवढ्या मोठ्या प्रमाणत चोरी केल्याची घटना घडली असल्याने आता कार्यक्रमाला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.एवढा तगडा पोलीस बंदोबस्त असताना त्यामध्ये अश्या चोरीच्या घटना घडतात कश्या,असा प्रश्न निर्माण होतो,आता या दोन्ही कार्यक्रमात चोरी करणाऱ्या चोरट्याना पकडण्याच पोलीसांसमोर आव्हान उभे राहिले आहे,आता पोलीस त्या चोरांना पकडण्यात यशस्वी होतील का याकडे लक्ष लागून आहे.