बहुली परिसरामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल सिल्लोड तालुक्यातील आदी गावातील पिके पाण्याखाली आल्याने यंदाच्या खरीप हंगाम अडचणीत आला आहे.काही ठीकाणी मका पिकाची सोंगणी झालेल्या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान समाधानकारक पावसाने अन् शेतकर्यांनी मोठया कष्टाने फुलवलेल्या शेतशिवारावर आस्मानी संकटाने कहर केला आहे .हातातोंडाशी आलेल्या पिकांचे डोळ्यादेखत मुसळधार पावसाने नुकसान होताना पाहण्याचे आले आहे . .यामुळे बळीराजा अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांना बळी पडत आहे .मागील दहा - पधरा दिवसापासून अलेल्या अति जोरदार पावसामुळे अनेक गावातील शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे .मागील दहा दिवसापासून पावसाने अक्षरक्ष:धुमाकुळ घातला या भागात , उडीद मूग. तुर,कपाशी, सोयाबीन. तूर ,मका,आदी पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा संपुर्ण हंगामाचेच नुकसान होण्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहे .मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील ऊभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे . अनेक गावात मागील दोन दिवसापासून परीसरात सतत सुरू असलेल्या जोरदार पावसाने ओल्या दुष्काळाची शेतकरी भीती व्यक्त करीत आहेत.
मका,कापुस, सोयाबीन, तूर अशा सर्वच पिकांना या परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला असुन शेतकरी वर्ग पुरता या अस्मानी संकटाने खचला असल्याचे चित्र सिल्लोड तालुक्यातील बहुली परिसरामध्ये दिसत आहे .पिके गेल्या दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे हाताशी आलेले पिक नाहीसे होतानाचे चित्र दिसत आहे .शेती ऊफळली आहे. अनेक गावात पिकांचे नुकसान झाले आहे .काही ठिकाणी सोंगणी केलेली पिके पाण्यात भिजत आहे .यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे .नुकसान झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात ..... अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे