बिडकीन स.भु.मध्ये राखीचे अनोखे प्रदर्शन!
औरंगाबाद- भारतीय संस्कृतीत बहिण भावाच्या नात्याचे अतूट बंधन म्हणजे रक्षाबंधन. यादिवशी बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधून तिच्या रक्षणासाठी भावाला साद घालायची असते तर भावाने तिच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी शब्द द्यायचा असतो अशी अख्यायिका आहे.भारतात नारळी पौर्णिमेला सर्वत्र हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.या रक्षाबंधनाचे औचित्य साधून पैठण तालुक्यातील बिडकीन येथील श्री.सरस्वती भुवन प्रशालेत भव्य व आकर्षक असे राखीचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
कार्यानुभवाच्या तासिकेत सुजाता तोष्णिवाल व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अमृता काळे,शितल नाईक या शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत आकर्षक अशा स्वतः त्या हातांनी विद्यार्थीनींनी राख्या बनविलेल्या होत्या. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र उत्साहात सुरु असल्यामुळे त्यावर आधारीत कलाकृती विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेने बनविलेली होती. नंतर बनविलेल्या राखी विद्यार्थीनींनी मानवी जीवनातील वृक्षाचे महत्त्व लक्षात घेऊन व वृक्षसंवर्धन काळाची गरज म्हणून वृक्षांना बांधली. प्रशालेचे मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, मानद मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी, विलास सोनजे, ज्ञानेश्वर चाटुपळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.या दिनाचे औचित्य साधून पर्यवेक्षिका राजश्री देशपांडे, वैशाली लोंढे यांनी रक्षाबंधनाचे महत्व या विषयी अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.संगित शिक्षक दिनेश संन्यासी यांनी रक्षाबंधनाचे " फुलो का तारो का....एक हजारो में मेरी बहना है हे गीत सुरेल आवाजात सादर केले. मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
(छायाचित्रे-विलास लाटे,ढोरकीन)