शिरुर : मराठा आरक्षण संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणा साठी अथक लढा देत आहेत. त्यासाठी उपोषण, मोर्चा जाहिर सभाद्ववारे त्यांनी समाजजागृती केली आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून जरांगे आंतरवाली सराटी येथून मुंबई कडे निघाले आहेत . लाखो समाजबांधवांसह मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले मनोज जरांगे व त्यांच्या समवेत असणारे समाजबांधव सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी शिरूर तालुक्यात येत आहेत. शिरूर तालुक्यात त्याचे भव्य स्वागत शिरूर शहर व पंचकोशीचा वतीने शिरुर शहरातील सतरा कमानी पूलाजवळ केले जाणार असून तेथे स्वागतासाठी समाजबांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे .त्याच ठिकाणी सुमारे २५ हजार समाजबांधवीची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. चपाती , शेंगदाणा चटणी , बुंदी ,मसालेभात , केळी ,बिस्किटे , पाणी बॉटल आदी बाबींची व्यवस्था करण्यात आली आहे. शिरूर सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनकर्ते बांधवांसोबत रुग्णवाहिका, डॉक्टर चे पथक पुणे शहरापर्यंत सोबत असणार आहेत .  मनोज जरांगे व आंदोलन कर्त्याचा मुक्काम  कारेगाव येथे होणार आहे .