रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर परिसरात एका मनोरुग्ण महिलेने शुक्रवारी दुपारी १.३० वा. च्या सुमारास चांगलाच धिंगाणा घातला होता. या महिलेने दोन ते तीन दुचाकीस्वारांना विनाकारण मारहाण केली. तसेच तिथेच पार्क केलेल्या दुचाकींचे नुकसान ही केले. नागरिकांनी या सर्व प्रकाराची खबर शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

शुक्रवारी दुपारी मारुती मंदिर येथे जाणाऱ्या एका तरुणाला मनोरुग्ण महिलेने अचानकपणे धरले. त्याच्या गाडीवर लाथ मारून गाडीच्या पॅनलचे नुकसान केले. तसेच त्याला विनाकारण मारहाण केली. अचानक घडलेल्या प्रकाराने तो तरुणही हबकला. मात्र मनोरुग्ण महिलेचा पारा चढलाच होता. त्या तरुणाशी वाद सुरू असतानाच त्याच्या मागून येणाऱ्या आणखी दोन वाहन चालकांना तिने दटावत दगड मारण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. या मनोरुग्ण महीलेला नेमकं करायचं तरी काय? असा प्रश्न सर्वांसमोर होता. मनोरुग्ण महिला शहराजवळच्या हातिस येथील आहे.

दरम्यान, या भागातील वाहतूक खोळंबल्याने जमलेल्या वाहन चालक व नागरिकांनी तातडीने याबाबत शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबर मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्या महिलेला ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेत असताना त्या महिलेने गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. संबधित महिलेचे नातेवाईक पोलिस ठाण्यात दाखल झाल्यावर त्या महिलेला शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र वाहनांचे नुकसान झालेल्या तरुणांना पोलिस ठाण्यात तक्रार न देताच परत फिरावे लागले आहे.