विद्या विकास हायस्कूल हिंगणघाट येथे विद्यार्थ्यांकरिता व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रसंगी अध्यक्ष म्हणून नितेश रोडे मुख्याध्यापक विद्या विकास हायस्कूल हिंगणघाट, अतिथी मार्गदर्शक म्हणून प्रा अभय दांडेकर संचालक एस बी एम एमपीएससी अकॅडमी हिंगणघाट यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली प्रसंगी प्रा अभय दांडेकर यांनी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत स्वतःला स्पर्धेत टिकविण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात केल्याशिवाय व्यवसायात प्रगती करता येत नाही हे सांगतानाच दहावी आणि बारावी नंतर व्यवसायाभिमुख कोणते शिक्षण घेता येईल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, अध्यक्षीय मनोगतातून नितेश रोडे यांनी फक्त नोकरी हाच पर्याय नाही तर व्यवसायातून सुद्धा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करता येते त्यामुळे नोकरी करण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा व्यवसायात मोठे होवून नोकरी देणारे बनण्याचा निश्चय करून प्रगती करा असा संदेश दिला ,सूत्रसंचालन शिक्षक सुधाकर टिपले यांनी केले तर आभार शिक्षक विक्रम सिडामे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं