सरपंच हा गावाचा प्रमुख व्यक्ती असुन त्यांच्यावर गावाच्या विकासाची धुरा असते हि धुरा सांभाळताना सरपंच्यांनी कोणत्याही पक्षपात भेदभाव करू नये व मिळालेल्या संधीचे सोने कसे करता येईल याचा मनात विचार बाळगून काम करून गावात आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन हिंगणघाट विधानसभा श्रेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांनी समुद्रपुर शहरातील दिपाली सभागृहात आयोजित सरपंच मेळ्यात व्यक्त केले.पंचायत समितीच्या वतीने सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आमदार समिर कुणावार तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार कपिल हाटकर, गटविकास अधिकारी रोशनकुमार दुबे, सहाय्यक गटविकास अधिकारी एकनाथ गुजरकर,माजी उपसभापती योगेश फुसे,प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले,संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकवर्गणीतून गावा शेजारी असलेल्या नाल्याचे खोलीकरण केल्याने पाण्याची पातळी वाढली या कामाबद्दल सरपंच जगदीश वरटकर व ग्रामसेवक रुपाली मुजबैले तसेच लोकवर्गणीतून गावा शेजारी असलेल्या नाल्याचे खोलीकरण केल्याने १५ ते २० शेतकऱ्यांच्या विहीरीची पाण्याची पातळी वाढली या कामगिरीबद्दल उपसरपंच देवांगना गेडाम व ग्रामसेवक रविंद्र जाधव ,मनसेगा अंतर्गत गावात १ हजार सीताफळाच्या झाळाची लागवड करणाऱ्या भोसा येथिल सरपंच पिंकी अंडस्कर व ग्रामसेवक नरेश डेहनकर ,खापरी येथिल जिल्हा परिषद शाळा डिजीटल करुन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण देण्याबद्दल सरपंच देविदास दोडके ग्रामसेवक हेमंत भोसले या सर्वांचा आमदार समिर कुणावार यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.आमदार समिर कुणावार पुढे म्हणाले सरपंच गावाचा मुख्यमंत्री असतो त्यामुळे त्याने पक्षपात न करता आपण गावातील प्रत्येक मानसाचे कामे कसी करायची यावर लक्ष केंद्रित करून त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन गावाचा विकास कसा करता येईल,गाव सुंदर कसे बनवायचे, याकडे लक्ष द्यावे असे मत त्यांनी व्यक्त केले.तर तहसिलदार कपिल हाटकर यांनी असा सरपंच्यांचा मेळावा मी पहिल्यांदाच पाहिला असुन खरच अशा कार्यक्रमातून सरपंचांना गाव विकासासाठी प्रेरणा मिळते या तालुक्यातील सरपंचांना माझ्या विभागाच्या वतीने जेही काम पडले ते करण्यासाठी मी नेहमी त्याच्या पाठीशी आहे.सरपंचानी आपल्या गावाचा विकासाकडे लक्ष देवून गावातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रर्यंतन करावे असे आवाहन त्यांनी उपस्तिथ सरपंचाना केले.यावेळी गटविकास अधिकारी रोशनकुमार दुबे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले तर माजी सैनिक तथा सरपंच मुर्लिधर चौधरी, सरपंच जगदीश वरटकर,सरपंच शारदाबाई तुमराम, ग्रामसेक नरेश डेहनकर यांनी आपले अनुभव व्यक्त केले. या मेळाव्याला सरपंच विलास नवघरे, राजु नौकरकर, किसनाजी शेंडे,वर्षा गणवीर,तालुक्यातील सरपंच, व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.येशस्वी करीता विस्तार अधिकारी पि.एच. मुरार,विस्तार अधिकारी आर.के.जाधव, नितीन वानखेडे आदिंसह पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं