वाघोली ता. हवेली येथील तेजस्विनी सामाजिक संस्थेचे अध्यक्षा सारिका किरण पवार यांना ग्लोबल ह्यूमन युनिव्हर्सिटी यांच्या वतीने दिला जाणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा डॉक्टर ऑफ सोशल सर्व्हिस हा पुरस्कार पॉंडिचेरीचे मुख्यमंत्री मा. एन. रंगास्वामी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी डॉ.जय महेश (मिसेस ग्लोब क्लासिक - इंडियन आँकेशन 2019 कॅलिफोर्निया, यूएसए विजेता), डॉ. एस सिद्धरथानं ( उच्च न्यायालय, मद्रास), वंदना किओ (सिव्हिल सोसायटी कोकेओ इंटरनॅशनलचे संस्थापक आणि अध्यक्ष - ४० देशांचे प्रतिनिधी) डॉ. वलरमाथी (सल्लागार मंडळ सदस्य, जीएचपीयू दिल्ली), डॉ. वासुदेवन ( संस्थापक इकोर बिजनेस सिस्टीम, चेन्नई), डॉ. रामचंद्र (सहसंचालक, जीएचपीयू), डॉ. मुरुगेसन (संचालक, जयम आरोग्य शिक्षण संस्था, तामिळनाडू), डॉ. जयकुमार वसंते (अध्यक्ष आणि CAMPTIF, फ्रान्स-युरोप) यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला ,
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वाघोली येथील तेजस्विनी सामाजिक संस्थेमध्ये देखील विविध मान्यवरांकडून किरण पवार यांचा सन्मान करत त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षीव करण्यात आला .