शिरुर : येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व, वादविवाद व उत्स्फुर्त वक्तृत्त्व स्पर्धा शुक्रवार दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे . स्पर्धे संदर्भात माहिती देताना प्राचार्य डॉ . के सी मोहिते यांनी सांगितले की एक महान सेनानी, धुरंधर राज्यकर्ता, साहित्य व ज्ञानाचे उपासक असणाऱ्या छत्रपती संभाजीराजांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद- विवाद व उत्स्फूर्त वक्तृत्त्व स्पर्धा प्रतिवर्षी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातर्फे आयोजित केली जाते. स्पर्धेचे यंदाचे ३७ वे वर्ष आहे. ज्ञानधिष्ठित क्रियाशील समाज निर्मितीसाठी वाचन, चिंतन, वैचारिक मंथन, चर्चा, वक्तृत्त्व वाद-विवाद इ. माध्यमांची नितांत गरज असते. आजचा महाविद्यालयीन युवक हा वर्तमान व भविष्याचा प्रतिनिधी आहे. त्याच्यातील सामाजिकतेचे भान व प्रश्नांची जाण समाजाला व्हावी हा या स्पर्धेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे मोहिते यांनी सांगितले . वरिष्ठ महाविद्यालय गटाचा वाद - विवाद स्पर्धेचा विषय 'युवापिढी ग्रंथवाचन-संस्कृतीपासून दुरावत आहे.' हा आहेत तर कनिष्ठ महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेसाठी १) रणझुंजार छत्रपती संभाजी महाराज २) सोशल मिडीया आणि मूल्यशिक्षण ३) जागतिक हवामान बदलाचे परिणाम हे विषय आहेत . वरिष्ठ महाविद्यालय गटातील स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या संघास मानाचा सांघिक फिरता चषक व स्मृतिचिन्ह व प्रथम पारितोषिक - रु. ७००१/- प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे बक्षिस असून व्दितीय पारितोषिक रु. ५००१/- प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह ,तृतीय पारितोषिक - रु. ३००१/- प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे आह वक्तृत्व स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालय करीता सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या संघास मानाचा सांघिक फिरता चषक व स्मृतिचिन्ह प्रथम पारितोषिक - रु. ५००१/- प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह ,व्दितीय पारितोषिक रु. ३००१/- प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह ,तृतीय पारितोषिक - रु. २००१/- प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह अशी बक्षीसे आहेत या स्पर्धेचे समन्वयक प्रा. बाळकृष्ण लळीत , प्रा. पुष्पा पानसरे , प्रा .डी के मांडलिक आहेत .

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |