दावोस : ओमानचे वाणिज्य व उद्योगमंत्री कैस बिन मोहम्मद अल युसुफ यांनी मंगळवारी दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी विविध विषयांवर संवाद साधतानाच ओमानच्या डिजिटल परिवर्तनाच्या ‘व्हिजन २०४०’ साठी महाराष्ट्र कशाप्रकारे सहकार्य करू शकतो यासंदर्भात चर्चा करण्यात आली.