शिरुर : मुंबई येथे मराठा आरक्षण संदर्भात आंदोलन करण्यासाठी मराठा आरक्षण क्रांतीयोध्दे मनोज जरांगे पाटील हे शिरुर मार्गे मुंबई येथे जाणार असून रांजणगाव गणपती जवळील कारेगाव येथे सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील याचा मुक्काम व जाहीर सभा होणार आहे . यासंदर्भात करावयाचा नियोजना बाबत न्हावरा फाटा ता . शिरुर येथील कानिफनाथ मंगल कार्यालयात समस्त सकल मराठा समाज शिरुर यांची बैठक संपन्न झाली . बैठकीत आंदोलनकर्त्याची भोजनव्यवस्था , निवासव्यवस्था पाणीव्यवस्था, चहा नाष्टा , व अन्य बाबी संदर्भातील नियोजना संदर्भात चर्चा झाली . जरांगे यांची सभा व मुक्काम कारेगाव येथील पुणे नगर रोड वरील व्हर्लपूल समोरील १०० एकराहून आधिक जागा असणा-या ठिकाणी होणार असुन याठिकाणीच सभा व आंदोलनकर्त्यांच्या मुक्काम होणार आहे . शिरुर तालुक्या व शिरुर शहरातुन घरा घरातून आंदोलनकर्त्यानसाठी चपाती व शेंगदाणा चटणीचे संकलन करण्यात येणार आहे . त्याच बरोबर विविध गावातुन बुंदीचे ही संकलन करण्यात येणार आहे. यास सर्वानी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे . त्याखेरीज शहर व तालुक्यातून रुग्णवाहिका ही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . पुणे नगर रस्त्यावर विविध ठिकाणी पिण्याचा पाण्याचे टॅकर व फुड पॅकेटस , चहा यांचे वाटप करण्यसंदर्भात नियोजन करण्यात आले आहे . या बैठकीला शेखर पाचुंदकर पाटील , संजय बारवकर , श्यामकांत वर्पे , आबासाहेब सोनवणे ,श्रीनिवास घाडगे , राजेंद्र जगदाळे , नानासाहेब लांडे , संभाजी कर्डिले ,भास्कर पुंडे , जयवंत साळुंखे , शोभना पाचंगे , वर्षा काळे , सुदाम कोलते ,राणी कर्डिले ,गणेश खोले , उमेश शेळके , योगेश महाजन , अविनाश जाधव , के .बी काळे , वीरेंद्र कुरुंदळे ,सचिन जाधव , रमेश दसगुडे , विलास बत्ते , गीताराणी आढाव , रुपेश घाडगे , आदित्य बो-हाडे , सत्वशीला पाचंगे , शामराव खरबस , कुमार नाणेकर आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .