[ रत्नागिरी ]

निवडणूक जाहीरनाम्यामध्ये महाविकास व इंडिया आघाडी बारसू- रिफायनरीविरोधी भुमिका घेईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत दिले.

बारसु-सोलगाव रिफायनरीविरोधी पंचक्रोशी संघटनेच्या शिष्टमंडळाने मातोश्री निवासस्थानात उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जोशी यांनी दिली. शिष्टमंडळात सत्यजित चव्हाण, शंकर जोशी, वैभव कोळवणकर, सुर्यकांत सोडये आदींचा समावेश होता.

नरेंद्र जोशी म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसु-सोलगाव पंचक्रोशी येथे प्रस्तावित रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पविरोधात स्थानिक शेतकरी अडीच वर्षे संघर्ष करत आहेत. या संघर्षात ग्रामस्थाकांवर प्रचंड दडपशाही करण्यात आली व येत आहे. सर्वच सर्वेक्षण बेकायदेशीरा झाले आहे. नाणार परिसरातील रिफायनरी रद्द केली होती. तेथील विरोधापेक्षा जास्त विरोध बारसु सोलगाव पंचक्रोशीतील नागरिकांचा आहे. कोकणात रासायनिक प्रकल्प नकोत, ही भूमिका शिवसेनेने घ्यावी व महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात कोकणात व पेट्रोकेमिकलसारखे रासायनिक प्रकल्प नकोत, अशी स्पष्ट कोकणवासियांची भावना आहे.