शिरुर : येथील बॅक ऑफ इंडिया शिरुर शाखेने सन २०२३ -२४ या वर्षात ३०० कोटी रुपयेचा बिझनेसचा टप्प्या पूर्ण केला असून या यशाबद्दल केक कापून शाखेतील आधिकारी व कर्मचारी यांनी आनंद साजरा केला . याबाबतची माहिती देताना शिरुर शाखेतील प्रशासन विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक शशिकांत बोरुडे यांनी सांगितले. बॅकेची सन १९६४ मध्ये शिरुर शहरात स्थापना झाली असून ३० हजाराहून आधिक खातेदार आहेत . बॅकेने यंदाचा वर्षात ३०० कोटी रु.च्या बिझनेस पूर्ण केला आहे . कृषीकर्ज , बचत गटाना कर्ज , प्रधानमंत्री सुरक्षा योजना ,होम लोन यासारख्या योजना प्रभावीपणे राबवित आहे . बॅकेने अनामत ठेव ,किरकोळ कर्ज ,कृषी कर्ज व गृहकर्ज यादवारे ३०० कोटी रु बिझनेसचा ट्प्प्या पूर्ण केला आहे . हा ट्प्प्या पूर्ण केल्याबद्दल केक कापून आनंद साजरा करण्यात आला . यावेळी बॅकेचे शाखा व्यवस्थापक सुचेंद्र सावंत , सहाय्यक व्यवस्थापक प्रशासन -शशिकांत बोरुडे ,कर्ज आधिकारी अमीत कुटे , कृषी आधिकारी तेजल सदाफळ , वरिष्ठ कर्मचारी शिवाजी बांडे ,कल्याणी अभंग , प्रियंका बिटके , रुपेश भोर ,शशिभूषण गिरी , संदिप जांभळकर आदी उपस्थित होते .

चौकट 

नवीन वर्षा निमित्त बॅक ऑफ इंडियाने सुपर स्पेशल फिक्स डीपॉझिट योजना आणली असून या योजनेदवारे १७५ दिवसाकरिता २ कोटी रु पासुन ते ५० कोटी रुपये पर्यतच्या रक्कमेची ठेव करता येणार असून त्यावर ७ .२५% इतके व्याज मिळणार आहे त्याशिवाय ८० वर्षा पेक्ष्या आधिक वयाचा सिनीयर सिटीझन नागरिकांकरिता असणाऱा ठेवी साठी ७.८०% इतका व्याजदर आहे .