हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावात मद्यपी बापाने पोटच्या लेकीचे सतत चार दिवस दिवस-रात्र  लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असल्याची माहिती पोलिसांनी प्राप्त झाली आहे. मोठे धाडस करीत घडत असलेला प्रकार १७ वर्षीय मुलीने शेजारच्या काकूला सांगितल्याने हि घटना उघडकीस आली नागरिकांनी नराधम बापाला पकडून पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार पीडितेची आई आजारी असल्याने तिला १ जानेवारी रोजीला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे तिच्याजवळ तिचा १२ वर्षीय मुलगा राहत होता, तर पीडिता ही वडिलांसोबत घरी राहत होती. नराधम बाप दररोज मद्य ढोसून तिच्यावर बळजबरी अत्याचार करायचा. दिवस रात्र पीडिता वडिलांच्या वासनेची सलग चार दिवस शिकार ठरली. अखेर पीडितेने मोठे धाडस करून घडत असलेला सर्व प्रकार शेजारच्या काकूंना सांगितला. मात्र, पीडितेच्या सांगण्यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. अखेर शेजारच्या काकूने पाळत ठेवली आणि ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वडील पुन्हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि पीडितेवर अत्याचार करू लागला. तेवढ्यातच शेजारच्या काकूने गावातीलच नागरिकांना सोबत घेत नराधम बापाला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक विष्णू भांडवले यांनी केली.