शिरूर ( प्रतिनिधी : प्रमोद लांडे ) | शिरूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या बद्दल जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ शिक्रापूर चाकण चौक येथे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या बद्दल जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ शिक्रापूर येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणा देत व जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा असलेले छायाचित्र जाळून निषेध करण्यात आला.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

त्याचप्रमाणे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी पोलीस प्रशासनालाही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले. गुन्हा दाखल न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ मांढरे यांनी केले आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार युवा मोर्चा अध्यक्ष रोहित खैरे यांनी केले.

या आंदोलनामध्ये भाजपा तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, किसान मोर्चा प्रदेश सचिव जयेश शिंदे, भाजपा ज्येष्ठ नेते बाळासाहेब चव्हाण, भाजपा उद्योग आघाडी अध्यक्ष राजाभाऊ मांढरे, कामगार मोर्चा अध्यक्ष, विद्या काका दरेकर, यांनी मनोगत व्यक्त केले.अशोक हरगुडे, बजरंग दलाचे अध्यक्ष महेश चव्हाण, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष सुरज चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष रोहित खैरे , तालुका सरचिटणीस केशव पाचर्णे, संतोष करपे, शिरूर हवेली विधानसभा विस्तारक रघुनंदन गवारे,भाजपा नेते पंढाभाऊ गायकवाड, भाजपा जिल्हा सचिव भाग्यश्री गायकवाड, ओबीसी महिला मोर्चा पल्लवी हिरवे, भाजपा चिटणीस सुनीता ताई जाधव, युवा वॉरिअरस अध्यक्ष वैभव गवारे,विद्याधर दरेकर,पदवीधर आघाडी अध्यक्ष कमलेश कुलकर्णी दिव्यांक आघाडी अध्यक्ष गोरक्ष कुंभार इत्यादींचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.