शिरुर :  विद्यार्थ्यानी वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवादाची कास धरावी असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र सी . टी बोरा कॉलेज अभ्यासकेंद्राचे मार्गदर्शक प्रा . चंद्रकांत धापटे यांनी केले . दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय दत्तात्रेयनगर पारगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि;शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरीक सहाय्यता कक्ष यांचा वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब जयकर बहि:शाल व्याख्यान मालेत 'अंधश्रध्दा 'या विषयावर धापटे यांचे व्याख्यान झाले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ . शत्रृघ्न थोरात ,भीमाशंकर शिक्षण संस्थेचे ओएसडी बी . डी .चव्हाण , केंद्र कार्यवाहक श्रीमती प्रा .डी. ए. .बोंबले , प्रा .सतीश धुमाळ आदी यावेळी उपस्थित होते . धापटे म्हणाले की अंधश्रध्दा निर्मूलनचा कामात डॉ . नरेंद्र दांभोळकर यांचे मोठे योगदान आहे . लोकांनी विवेकवादी होवून विविध विषया संदर्भात प्रश्न निर्माण झाले पाहीजे . .नवसाने अपत्ये होत नाहीत . कोणत्याही चमत्कारा मागील विज्ञान समजून घ्या . कोणत्याही विषयातील कार्यकारण भाग चौकसपणे जाणुन घ्यावे असे सांगून विविध चमत्कार हातचलाखीचे प्रयोग धापटे यांनी प्रात्यक्षिकासह दाखविले . विद्यार्थ्यानी परीक्षण व निरीक्षण करण्याची सवय अंगी बाणवत डोळस बना . विविध विषयाची माहिती घ्या , विविध पुस्तकांचे वाचन करा व विद्यार्थ्यानी विज्ञाननिष्ठ बना असे आवाहन त्यांनी केले . प्राचार्य डॉ . थोरात यांनी महाविद्यालया संदर्भातील माहिती देवून महाविद्यालयातील उपक्रमांची माहिती दिली . यावेळी प्रास्ताविक प्रा संजीवनी साठे यांनी केले . आभार प्रा. डी .ए बोंबले यांनी मानले .